Monday 12 September 2011

शिक्षणसेवकांना मानधनवाढ दिवाळीपासून मिळावी

सावंतवाडी - शिक्षणसेवकांना केलेली मानधनवाढ दिवाळीपासून मिळावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अद्यापक संघाने निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, की शिक्षण सेवकांच्या पदनामात बदल करून शिक्षण सेवकांचे पदनाम सहायक शिक्षक करून त्यांच्या मानधनात दुप्पट वाढ केली. मुळातच मानधन एकदम कमी ठेवून दुपटीने केलेली वाढ महागाईच्या मानाने अपुरी आहे. सारखेच काम करणाऱ्या शिक्षकांच्या तुलनेत ही वाट कमीच आहे. तरीही मानधन वाढविले व सेवकाचा दर्जा कमी केला हेही काही कमी नाही. या निर्णयाचे जिल्हा माध्यमिक अद्यापक संघ स्वागत करते; मात्र 1 जानेवारी 2012 पासून ही वाढ जाहीर केली. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकून ही वाढ दिवाळीचे औचित्य साधून दिवाळीपासून लागू करावी. शिक्षणसेवक वेतनवाढीसाठी संघाने अनेक आंदोलने केली होती. शासनाने हा विलंबाने निर्णय घेतला. 6 वा वेतन आयोग लागू करूनही शिक्षण क्षेत्रात केवळ अल्प मानधन असलेल्या घटकावर अन्याय केली होता. खरे म्हणजे ही वाढ 6 व्या वेतन आयोगापासूनच मिळायला हवी होती. निदान निर्णय जाहीर करून विलंबाच्या प्रतीक्षेत ठेवण्यापेक्षा दिवाळीपासून तरी किमान मिळावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

No comments:

Post a Comment