मुलांनो, तुम्ही सर्वजण जाणता की भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो. ज्या शिक्षकांनी आपणास ज्ञान आणि जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी दिली, त्यांच्याविषयी या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. केवळ विद्यार्थी- विद्यार्थींनीच नव्हे तर मोठी माणसेसुद्धा आपल्या पुज्य गुरुजनांचे स्मरण करतात, त्यांना वंदन करतात. आणि त्यांच्याविषयीची आपलेपणाची भावना व्यक्त करतात. या शिक्षक दिवसाची सुरुवात आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसापासून झाली. डॉ. राधाकृष्णन तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. ऑक्सफर्ड विद्यापीठाने 'हिंदूंचा जीवनविषयक दृष्टीकोन' या विषयावर व्याख्यान देण्यासाठी अनेकदा आमंत्रित केले होते. आपल्या देशाप्रमाणेच अन्य अनेक देशांमध्येसुद्धा शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चला तर मग, जाणून घेऊयात अन्य देशातले शिक्षक दिन! आणि ते केव्हा केव्हा साजरा करतात ते पाहू.
रशियामध्ये प्रारंभी 1965 ते 1994 पर्यंत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी शिक्षक दिन साजरा केला जात होता. 1994 पासून जागतिक शिक्षक दिनीच रशियानेही शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. हा आंतराष्ट्रीय शिक्षकदिन पाच ऑक्टोबर रोजी असतो.
अमेरिकेत मेच्या पहिल्या मंगळवारी शिक्षक दिन घोषित करण्यात येतो आणि तेथे आठवडाभर यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वेनेजुएलामध्ये शिक्षक दिवस 15 जानेवारीला साजरा केला जातो. या निमित्ताने होणार्या प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वत: राष्ट्रपती भूषवतात आणि या दिवशी देशातल्या आदर्श शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
मंगोलियाने शिक्षक दिवस साजरा करायला 1967 पासून प्रारंभ केला. हा दिवस दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या रविवारी साजरा केला जातो.
थायलंडमध्ये दरवर्षी 16 जानेवारी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. येथे 21 नोव्हेंबर 1956 साली एक प्रस्ताव ठेवून शिक्षक दिन साजरा करण्यास मान्यता दिली होती. पहिला शिक्षकदिन 1957 ला साजरा करण्यात आला होता. या दिवशी येथे शाळांना सुट्टी असते.
इराणमध्ये तेथील प्राध्यापक अयातुल्लाह मोर्तेजा मोतेहारी यांच्या हत्येनंतर त्यांच्या स्मरणार्थ दोन मे रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. मोतेहारी यांची दोन मे 1980 साली हत्या करण्यात आली होती.
तुर्कीमध्ये 24 नोव्हेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. तेथे पहिले राष्ट्रपती कमाल अतातुर्क यांनी ही घोषणा केली होती.
मलेशियामध्ये यास 16 मे रोजी साजरे करण्यात येते. तेथे या विशेष दिनास 'हरि गुरु' म्हणतात. अल्बानिया या देशात शिक्षक दिवस 7 मार्चला असतो.
चेक आणि स्लोवाकिया 28 मार्चला शिक्षक दिन साजरा करतात. या दिवसाच्या अगोदरपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात झालेली असते. आणि नंतरही हा उत्सव काही काळ चालू असतो. इंडोनेशियामध्ये दरवर्षी 2 मेला राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. पोर्तुगालचा शिक्षक दिवस १८ मेला असतो. याचा प्रारंभ 1980 पासून झाला. तर जर्मनीमध्ये शिक्षक दिवस 12 जूनला असतो.
हंग्रीमध्ये शिक्षक दिवस 5 जूनला साजरा केला जातो. तर कोरियामध्ये 8 सप्टेंबरला साजरा करतात. या दिवशी तिथले सरकार आदर्श शिक्षकांना वीर- श्रमिकचा पुरस्कार देऊन सन्मान करते. पोलंडमध्ये शिक्षक दिनाचा उत्सव 14 ऑक्टोबरला साजरा केला जातो. चीनमध्ये शिक्षक दिन 10 सप्टेंबरला साजरा करतात. या अगोदर ही तारीख अनेकदा बदलण्यात आली होती.
चीनमध्ये 1931 पासून नॅशनल सेंट्रल युनिवर्सिटीमध्ये शिक्षक दिनास साजरा करण्यात येत होता. चीन सरकारनेही 1932 साली याला मान्यता दिली होती. नंतर 1939 मध्ये कन्फ्यूशियस यांच्या जन्मदिवशी 27 ऑगस्टला शिक्षक दिन घोषित केला गेला, परंतु नंतर 1951 मध्ये ही घोषणा मागे घेण्यात आली.शेवटी 1985 पासून ही तारीख निश्चित करण्यात आली.
- मच्छिंद्र ऐनापुरे
संभाजी चौक, के.एम. हायस्कूलजवळ, . जत ता. जत जि. सांगली 416404

No comments:
Post a Comment