राममोहन खानापूरकर, संशोधक, प्राथमिक शिक्षण, ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई.
काही वर्षांपूर्वी चौथीपर्यंत पोचूनसुद्धा अमेरिकेतील मागास वर्गातील मुले दुसरीची पुस्तके वाचू शकत नाहीत, असे एका राष्ट्रीय अहवालाने सिद्ध केले होते. या अहवालामुळे अमेरिकन समाजजीवनात मोठय़ा प्रमाणावर बौद्धिक घुसळण झाली. या शैक्षणिक समस्येकडे डोळसपणे पाहणाऱ्या विद्यापीठांपासून ते शिक्षणतज्ज्ञांनी कंबर कसली आणि ‘लहान मुलांसाठी वाचन ओळख’ हा आपल्या चिंतनाचा विषय बनवला. एक राष्ट्रीय आपत्ती म्हणूनच सर्व समाजाने त्याकडे पाहिले व त्यासाठी नवीन ज्ञानविश्वाची रचना केली. The National Early Literacy Panel (NELP) सारखे उपक्रम हातात घेऊन अमेरिकन सरकारने ‘आरंभिक वाचन ओळख’ या विषयासाठी राष्ट्रीय धोरण आखले. तेथील शिक्षक संघटनांनी पुढाकार घेऊन Teaching Reading is a Rocket Science या अभिनव प्रशिक्षण पुस्तकाची निर्मिती केली. हा सर्व विषय ‘आरंभिक साक्षरता’ (Early Literacy) या विषयांतर्गत येतो. पाश्चिमात्य देशांमध्ये यावर विद्यापीठे व भाषातज्ज्ञ जीव ओतून काम करतात. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे आपल्याकडेही अनेक वर्षे चौथीपर्यंत पोचूनसुद्धा मुले लिहिती-वाचती होत नाहीत. याबद्दल प्रसारमाध्यमे, मोठय़ा संस्था ओरड करताना दिसतात. मात्र संशोधक वृत्तीने उपाययोजना करण्यापेक्षा आगपाखड करण्यावर आपला अधिक भर असतो. जागतिक स्तरावर प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये ‘आरंभिक वाचन व लेखन ओळख’ हा विषय महत्त्वाचा मानला जातो. त्याकडे गांभीर्याने पाहून उपाय शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील ‘क्वेस्ट’ ही शैक्षणिक संस्था (QUEST- क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) गेली काही वर्षे करत आहे. या संस्थेतर्फे अलीकडेच वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेसंदर्भातील संस्थेच्या कामाचे प्रदर्शन भरवले गेले होते. त्यानिमित्ताने या संस्थेच्या मूलभूत कामाची ओळख करून द्यावीशी वाटते.
ठाणे जिल्ह्य़ातील वाडा तालुका व नंदुरबार जिल्ह्य़ात संस्थेचे पूर्णवेळ प्रकल्प सुरू आहेत. राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळांना या संस्थेकडून सहकार्य दिले जाते.
प्राथमिक शिक्षणासंदर्भातील पहिली व महत्त्वाची समस्या म्हणजे या शाळांतील शिक्षकांच्या सक्षमीकरणाची. कालबाह्य़ झालेल्या डी.एड. अभ्यासक्रमाची शैक्षणिक पुर्नरचना करण्याची प्राधान्याने गरज आहे. ‘क्वेस्ट’च्या पुढाकाराने स्थापन झालेला ‘शिक्षकांचा अभ्यास गट’ महिन्यातून एकदा वाडा तालुक्याच्या सोनाळे गावातील कार्यालयात भरतो. पंचक्रोशीतले शिक्षक त्या गटात येऊन चर्चा, वाद-विवाद व मतप्रदर्शन करतात. शिक्षणविषयक विविध बाबी प्रकटपणे मांडण्यासाठीची अभिव्यक्ती त्यांना हा गट देतो. शिक्षणातील परिवर्तन, नवशिक्षणातील घडामोडी, शैक्षणिक धोरणे अशा विषयांवर मनमोकळी चर्चा या गटात होते. कालांतराने अनेक शिक्षकांना या गटात सामील करून घेण्याची गरज या संस्थेला वाटू लागली. जे वाडय़ातील शिक्षकांना मिळते ते नंदुरबारमधील शिक्षकांनादेखील मिळावे, ही भावना त्यामागे होती. त्यासाठीच इंटरनेटचा वापर करून मराठीतून ऑनलाइन अभ्यासक्रम राबवायची व इंटरनेटद्वारा व्यासपीठ तयार करण्याची अभिनव संकल्पना या संस्थेने अमलात आणली.
वर्गातील अध्ययन-अध्यापनाची चौकट अधिक संदर्भपूर्ण, कल्पक व पद्धतशीर व्हावी यासाठी ऑनलाइन व्यवस्थेचा पूरक-व्यवस्था म्हणून प्रभावी वापर करता येतो. मोठमोठय़ा शैक्षणिक संस्थांमध्ये अशाप्रकारे ऑनलाइन कोर्सेस राबवण्याची कार्यसंस्कृती रुजली आहे. अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन व्यवस्थापनासाठी मुडल (MOODLE) ही इंटरनेट-आधारित अध्ययन प्रणाली लोकप्रिय आहे. ही प्रणाली मुक्त स्वरूपातील (Open Source) असल्याने ती विनामूल्य उपलब्ध आहे. मात्र आजच्या घडीला मुडलचा वापर हा इंग्रजी केंद्री आहे. त्याचा मराठीतून वापर करण्याचा अनोखा प्रकल्प ‘क्वेस्ट’मार्फत महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबवला गेला आहे. नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्याच्या लोणखेडा गावातील साने गुरुजी शिक्षण मंडळाच्या डी.एड्. महाविद्यालयाने यासाठी पुढाकार घेतला. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मुडलद्वारे ऑनलाइन शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचा पहिला टप्पा ‘क्वेस्ट’ने यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. दुर्गम ग्रामीण भागांत प्रादेशिक भाषेतून तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल प्रशंसनीय आहे. मुडलने उपलब्ध करून दिलेल्या सोयी वापरण्याआधी त्याचा तांत्रिक तपशील समजावून घेणे, प्रशिक्षणार्थीपर्यंत त्याची उपयोजिता पोचवण्याचे काम संस्थेने केले. या व अशा विविध प्रकल्पांसाठी सर रतन टाटा ट्रस्टचे पाठबळ संस्थेला लाभले आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेल्या शिक्षकांना एकत्रित करण्यासाठी ‘ऑनलाइन व्यासपीठ’ या संस्थेने तयार केले आहे. या व्यासपीठामार्फत आज अनेक शिक्षक शैक्षणिक बाबींवर खुलेपणाने चर्चा करत आहेत. या व्यासपीठाच्या प्रभावी वापरासाठी सहभागींना मराठीतून टंकलेखनाचे रीतसर प्रशिक्षणदेखील देण्यात आले. हे व्यासपीठ म्हणजे कुठलेही प्रोत्साहन नसलेल्या ग्रामीण भागातील शिक्षकांचे एकप्रकारचे फेसबुकच आहे. नवशैक्षणिक विचारांतून संशोधनमान्य झालेल्या विविध अध्यापन पद्धती या व्यासपीठाद्वारा शिक्षकापर्यंत सातत्याने पोचवण्यात येतात. ‘मुडल’ आणि ‘ऑनलाइन व्यासपीठ’ ही शैक्षणिक परिवर्तनाची आधुनिक साधने आहेत. मात्र त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निव्वळ तंत्रज्ञान पुरेसे नाही. कळीचा प्रश्न आहे तो प्रादेशिक भाषांमधील दर्जेदार वैचारिक मजकुराचा. सध्याच्या साचेबंद शैक्षणिक वाचन-साहित्याला मोकळे करण्यासाठी वैविध्यपूर्ण मजकूर तयार करण्याचे कामही ‘क्वेस्ट’ने एकीकडे सुरू केले आहे. माहिती तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागांतील शिक्षकांच्या गुणवत्तावृद्धीचा हा अभिनव प्रकल्प शिक्षण खात्याने समजावून घेऊन त्याच्या सार्वत्रिकीकरणासाठी धोरण आखण्याची गरज आहे.
ग्रामीण व आदिवासी भागांतील मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न लक्षात घेऊन उभारलेला ‘आरंभिक अक्षर व वाचन ओळख’ हा संस्थेच्या कामाचा गाभा आहे. किंबहुना या प्रश्नावर एवढय़ा सखोलपणे काम करणारी क्वचितच एखादी संस्था असेल. मुळात प्राथमिक स्तरावर भाषाशिक्षणाच्या (अक्षर व वाचन ओळख) आपण वर्षांनुवर्षे प्रमाण मानलेल्या अध्यापन-पद्धतींमध्ये मूलभूत दोष आहेत. डॉ. मॅक्झिन बर्नस्टनसारख्या अमेरिकन विदूषीने आपल्या संशोधकीय लिखाणातून पाठय़पुस्तकातील मराठीच्या अध्यापन पद्धतीतील दोष सप्रमाण दाखवून दिले आहेत. आपल्याकडेही NCERT सारख्या संस्थांनी यावर काम करून प्रारंभिक स्तरावरील योग्य भाषाशिक्षण पद्धतींची काही मानके व प्रारूपे तयार केलेली आहेत. मात्र त्याच्या सार्वत्रिकीकरणाच्या अभावामुळे आपल्याकडे पहिली-दुसरीच्या स्तरावर मुलांची भाषाओळख (विशेषत: वाचन ओळख) सदोष पद्धतीने होते. त्याचा कायमस्वरूपी त्रास त्यांना पुढील इयत्तेत होतो व मुलांची शैक्षणिक वाढच खुंटते. यासाठी प्रकल्पांच्या गावांमध्ये ‘क्वेस्ट’ शाळेच्या वेळानंतर बालभवने चालवते. गावांतील तरुणांना प्रशिक्षित करून त्यांच्याद्वारे आरंभिक वाचन-लेखनाचे वर्ग चालवले जातात. ‘क्वेस्ट’च्या संशोधकीय कार्यपद्धतींना अनुसरून कोणताही उपक्रम राबवण्याआधी ‘क्वेस्ट’चे प्रशिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांचे सखोल सर्वेक्षण करतात. त्यामुळे मुलांच्या सद्य:स्थितीचा नेमका अंदाज बांधता येतो व त्यानुसार कार्यक्रमाची पातळी ठरवली जाते. हा कार्यक्रम पहिली ते चौथीच्या स्तरावर राबवण्यासाठी ‘क्वेस्ट’ने ‘माझे पुस्तक’ या पूरक कार्य-पुस्तिकांच्या मालिकेची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील सांस्कृतिक पाश्र्वभूमी लक्षात घेऊनच या पुस्तिकांची निर्मिती केली गेली आहे.
रोजच्या कामाचे प्रलेखन व त्याचे संशोधकीय मूल्यमापन हे ‘क्वेस्ट’च्या कामाचे आणखी एक वैशिष्टय़. वाचन-ओळख अध्यापनाची गुणवत्ता सुधारून मुलांमध्ये त्याची जोपासना करणे ही सातत्यपूर्ण व दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठीच्या संशोधन कार्यक्रमाला 'Longitudinal Study' असे शिक्षणक्षेत्रात संबोधले जाते. अशा प्रकारच्या अभ्यासानेच खरेखुरे ‘रिझल्ट’ मिळत असतात व कामाला दिशा लाभते. प्राथमिक शिक्षणाला अशी दिशा दाखविण्यासाठीच ‘क्वेस्ट’ने लांबपल्ल्याचा पण दूरगामी परिणाम घडवून आणणारा मार्ग निवडला आहे. बहुतांश ग्रामीण भागांमध्ये मुलांच्या घरात बोलली जाणारी भाषा व शाळेच्या पाठय़पुस्तकांतील भाषा यात काहीसा फरक असतो. ही दरी बुजवण्यासाठी काही विशिष्ट अध्यापन-पद्धती ‘क्वेस्ट’ राबवते. भाषा शिक्षणातील अशा विशिष्ट पैलूंवर आपल्याकडे एवढा विस्तारपूर्वक व नेमकेपणाने अभ्यासच झालेला नाही.
शिक्षकांच्या सातत्यपूर्ण विकासासाठी ‘क्वेस्ट’ राबवत असलेल्या उपक्रमांची व्याप्ती आता वाढली आहे. गणित व भूगोल अध्यापनांतील विविध संकल्पनांवर शिक्षकांसोबत येथे वैशिष्टय़पूर्ण काम केले जाते. त्यासाठी ‘क्वेस्ट’ शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करते. जाता-जाता एका महत्त्वाच्या प्रकल्पाचा उल्लेख करणे अपरिहार्य आहे. वाडा तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी परिसर-शिक्षणाचा भाग म्हणून गावातील ऊर्जा व शेतीच्या मूलभूत समस्यांचा अभ्यास करून त्यावर शास्त्रीय उपाय सुचवले आहेत. त्या अभ्यासावर आधारित विज्ञान प्रकल्प केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी’ गेली तीन वर्षे निवडले जात आहेत. दुर्गम ग्रामीण भागांतील साधनविरहित विद्यार्थ्यांची ही बौद्धिक भरारी कौतुकास पात्र आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांना व प्रकल्पासाठी नेमलेल्या शिक्षकांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून ‘क्वेस्ट’च्या टीमने बहुमोल सहकार्य केले आहे by- loksatta

No comments:
Post a Comment